माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३
!! गाठ !
त्याला पंचवीस वर्षे लोटली
या लोटलेल्या दिवसांची
पानं उलटली .......
नुसतीच फरफट दिसली .....
चार वर्षात गाठीवर चार गाठी
आणि वंशवृद्धीची
वेस गाठली.........!
पण .....
आपण आहोत तिथेच आहोत
एकमेकाना समजून घेतांना
तुझी रड , तुझा बहाणा
माझी रग , कधी केविलवाणा.
आपली गाठ घट्ट आहे..
हा नुसताच हट्ट आहे ...!
वरच्या गाठी सैल
होत नाहीत .....
तो पर्यंत
अशीच .... अशीच...एकमेकांशी
गाठ आहे....!!!
"चारोळी"
.jpg)
पश्चिमेला डोंगराआड
चंद्रकोर लपली .....!
अनं... चांदण्यांच्या सोबतीला
रात्रच उरली ........!
"समिधा"
"समिधा"
"तुझी भेट" ...?
तू कधीतरी .....
एखाद्या वळणावर.....
नकळत भेटशील ....!!
तेंव्हा मनातील आंदोलनांना
थोपवताना माझी
होणारी तारांबळ ....
तुला माझ्या नजरेत दिसेल...!!
ओठात हसू असेल
दाबून टाकेन ....आतल्याआत ....
आणि तेवढ्यात ....
डोळे देतील दगा .....!
आणि पाझरतील माझा
निषेध झुगारून...
शब्द थरथरतील .....!
कारण ....
तू गेलास मान वळवून...
मागे वळून न पहाता ...!
मी अजुन तिथेच ..
त्याच वळणावर आहे ....
जिथे तू सोडून गेलास...
प्रश्नचिन्हासहित.......??????
समिधा
समिधा
तुझ्या विरहात रे .......!
घन निळे झाले मन
तुझ्या विरहात रे .......!
भरुनी हृदय गच्च झाले
गंध श्वासात रे.......!
भान सुटले मनाचे
कळा लागल्या जीवा
पाहता नभात रे......!
दाटुनी नभात जेव्हा
घन व्याकुळ रडले
साद माझीच ती
एक तू...
आक्रोश धारांत रे ....!!!
समिधा
समिधा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)