किती वेळा मला डीलीट फीलीट करून आत बाहेर करशील ..... किती वेळा लिहीशील माझ्यावर माझ्यासाठी ? एकदाच काय तो माझा आशय ठरव...! आणि संपव मला एकाच अर्थावर जिथे तूला शांती अनं मलाही मुक्ती असेल.... फक्त एकच सांगते परत परत मला खोडू नकोस कवितेचे प्रारूप समजून !