
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
मंगळवार, १० जानेवारी, २०१७
हया अंतरीच्या गाठी.......

कधी येशील सख्या
गंधाळली रात दारी
चंद्र तेवतोय मंद
सरू नकोस सख्या
किती सरली युगे
तुझीच शब्दवेडी...
प्रिय.....
तुझ्या इनबॉक्सच्या गेटवर
माझे काही शब्द ताटकळत उभे आहेत...!
आणि तुलाही हे ठाऊक आहे...
तू उघडशील दार
तर ते भसकन आत येतील
आणि मग पुन्हा वेदनांचा कल्लोळ माजेल .....!!!
हे ही तुला ठाऊक आहे....
पण इतकी वर्ष मनाचे दार
सताड उघडे ठवून एकही
वेदना बाहेर गेली नाही नां.....
मग माझ्या शब्दांना असा का
टाळतोस.....
वेदना शब्द बनून भळभळून
वाहून जाऊ दे ना....
बघ मग तुझा इनबॉक्स
गच्च भरून वाहायला लागेल
साराच साठलेला गाळ
निघून जाईल आणि तळाला उरेल
फक्त आपले पारदर्शी नितळ स्वच्छ मन ....!
तुझीच शब्दवेडी...
© "समिधा"
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)