
मी माळले श्वासात तुला ....!
अनं ---
तू असशी इथे तिथे
हे भासही गळाले ....!!
मी प्राशीले गंधात तुला ....!
अनं ---
तू माझ्याहुन वेगळा
हे भानही नाही उरले .... !!
मी दिन राती गणल्या
तुझ्याच भेटींना ....!
अनं ---
तू नजरेआड होता
दिन माझे मावळले ....!!
मी पहाते अवती भवती
तुझ्याच खुणांना .... !
अनं ---
तू तसाच पाही मजला
मज अंतरंगी कळले ….!!
तू वाट धुक्याची आहे …
मी भास आभासांची ....!
अनं …
हे सर्व जाणिले तरी ....
प्रेमात रमलो खुळे …!!!
" समिधा "