
काहीच मागे
ठेवले नाहीस
तुझी ओळख सांगायला ...!
तसे मागल्या दारी
लावलेस आंबे
मागे ठेवलेस शिंपायला ....!
काय कुठे गेल्या वाटा
फाटे फुटले नात्यांना
येता जाता विचारतात
काय आले वाट्याला ......?
दूर कोप-यात तुझी आई
ऊर बडवीत रडते आहे
माझं बाळ ....माझं बाळ..
रात्रंदिवस रडते आहे ......!
तरुण विधवा तुझी पत्नी
पोटात अंधार, जळते आहे....!
धर्म-अर्थ-काम-मोक्ष
मधोमध फिरते आहे ......!
अतृप्त....अतृप्त.....अतृप्त...!!!!!
"समिधा"
तुझी ओळख सांगायला ...!
तसे मागल्या दारी
लावलेस आंबे
मागे ठेवलेस शिंपायला ....!
काय कुठे गेल्या वाटा
फाटे फुटले नात्यांना
येता जाता विचारतात
काय आले वाट्याला ......?
दूर कोप-यात तुझी आई
ऊर बडवीत रडते आहे
माझं बाळ ....माझं बाळ..
रात्रंदिवस रडते आहे ......!
तरुण विधवा तुझी पत्नी
पोटात अंधार, जळते आहे....!
धर्म-अर्थ-काम-मोक्ष
मधोमध फिरते आहे ......!
अतृप्त....अतृप्त.....अतृप्त...!!!!!
"समिधा"