
माझ्यात तिला उतरवण्याचा अट्टाहास फिजूल होता
तिला तिच्या सावलितही माझा चेहरा कबूल नव्हता ॥ १ ॥
पाहिले तिच्या नजरेच्या पल्याड एक आकाश होता
मी कुठेच आस पासही नव्हतो असलोच तर एक पाश होता || २ ॥
ती खोल डोहाचा एक अथांग अविरत स्रोत होता
माझा काठावरचा निश्च्छल ताठ काटेरी पहारा होता ॥ ३ ॥
ती सोडून गेली तेंव्हा प्रश्न पडलेच नाहीत तिला
माझ्याभोवती तेंव्हा प्रश्नसंशयाचा फास होता ॥ ४ ॥
" समिधा "