सोमवार, १३ मे, २०१३

सोहळा .......!

Image result for girl alone with rising sun pic


तुझ्या नावानेच जर ,

आयुष्याचा उत्सव साजरा

करायचे ठरविले आहे .....!

तर  कशाला दुख-या

जखमांचा सोहळा करू .......?

तुझ्या बरोबरच्या अगणित

टिपक्यांची रांगोळी माझ्याभोवती  रेखुन .......

कधीची उभी आहे .....

तुझ्याच आठवणींची तोरणे लावून ....

माझ्या प्राक्तनाच्या  दारात .........!

तू आता परतणार नाहीस

याची खात्री आहे ...........!

तरी मंद प्राण तेवत


रहाणार आहे .........

माझ्या  अंर्तगाभा-यात .....

तो पर्यंत, तरी तुझ्या नावाचा

सोहळा मी साजरा

करणार आहे ..............

तू नसतांना ...........

आणि

कुठेतरी  तुलाच शोधतांना ............!!!


                                                            समिधा

रविवार, १२ मे, २०१३

चंद्राला ग्रहण लागले की .........!




चंद्राच्या डोळ्यांत 

तुझ्या-माझ्या किती भेटी 

साठलेल्या ..... गोठलेल्या ......!!!

जेंव्हा जेंव्हा चंद्र पहाते 

त्याच्या प्रकाशातुन 

त्या झिरपतात , माझ्या मनात ,

अंतरात ......

आणि रहातात बिलगलेल्या ......

तो बघ चंद्र आणि हस पाहू ......!!!

असं तू म्हणायचास .........

आजकाल मला असं एकटीलाच 

बघून .....तो माझ्यावर

हसल्याचा भास् होतो ........

मग मीच आताशा 

आमावास्येला बाहेर पडते… 

आणि एरवी ......

तो बाहेर पडायच्या आत 

घरात येते .....

लपंडाव किती ,कुठवर .....?

चंद्राला ग्रहण लागले की .........

पहिलं  दान तुझेच मागेन ......!

गुरुवार, ९ मे, २०१३

"गुलमोहर "




दारातला गुलमोहर
पाहीला की ,
मनातला  वसंत
फुलून येतो .........!
अनं-
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
विझवून जातो .....!

रक्त आरक्ति
गुलमोहरी गालिचा
आठवला की,
मनातला शृंगार
खुलुन येतो…… ..!
अनं-
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
विस्कटून जातो .....!

या गुलमोहराला
रोज सांगत असते
मनातले गुज
आपल्यातले हितगुज
सारेच तो ऐकून घेतो ....!
अनं -
मग असा
बहर उधळतो
गुलमोहरी
गालिचा पसरतो ........!
अनं -
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
माझ्याही नकळत
"वसंत " होतो ............!


                                   समिधा 




शनिवार, ४ मे, २०१३

तू अनं मी........!!

तू चांदण्यांचे शिंपण 

अनं 

मी लाव्हारस होते ........!

तू शीतल गंध चंदन 

अनं 

मी स्वाह: समिधा होते ....!

तू निष्पाप -निरागस संवेदन 

अनं 

मी जाणिवांचे अंदोलन होते .....!

तू घेउनि आलास 

आयुष्य मिलनाचे बंधन 

अनं 

मी क्षितिजावरचे वियोगी 

आक्रंदन होते ........!


                             समिधा    










विरहाचे ढग पाझरले........!!!




सरले, विरले, विरहाचे 

ढग पाझरले 

डोळ्यातून तुझिया 

अंतरी माझिया 

उतरले 

झाले , जीवनलेणे 

जन्माचे .......

तुझे ते 

व्याकूळ पाहणे ......!!!!


                                       " समिधा "




शुक्रवार, ३ मे, २०१३

"काहीतरी 'नवे' नाव दयावे" ........!!





तुला मला माहीत आहे

जूने  नाते संपले आहे .....!

तरी एकमेकांना

सामोरे जातांना

मनात हलकेच मोरपीस

फिरत नाही ....... तर

कुठेतरी .... काटेरी

कुंपणाचा वेढा

वाढत आहे ......!

ते काटेरी कुंपण

उखडण्यासाठी तरी

भेटावे ...........!

तुझ्या माझ्यातल्या नात्याला

काहीतरी   'नवे'   नाव दयावे ........!!

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

"मी रंग वेडी........!






तू तुझ्या विश्वातले

रंग उधळीत

आलास माझ्याकडे

मीही कशी रंगवेडी

सारेच रंग ल्यायले

अंगभर .....

भान  माझे सुटले

वेढिले  मी तुला ....

अनं  वा-यावर शुभ्रधवल

डागाळलेला पदर मोकळl ...........!


                                                          समिधा