
प्रेम दोघांनी केलं ....
तू साठवलं
गोठवल .....
मी माळलं
उधळलं .....
प्रेम तुझं
पंचमहाभूतांच्या
परिघात फिरत
राहील ......
प्रेम माझं
परीघ फोडून
अखंड प्रसवत
राहिलं .......
प्रेम तुझं
क्षितिजापाशी
पूर्णविराम घेणारं .....
प्रेम माझं
अस्तानंतरही
दाही दिशा
उधळणारं .......
प्रेम तुझं तू
मला दिलं
मी माझं -तुझं
तुलाच दिलं .......!!!
समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा