शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

: मागणे . . . .!!






तुझ्याकडे  माझे अधिक 

काही मागणे नाही......!
आता सारे संपले आहे.
अधिक काही सांगणे नाही....!

तू  पौर्णिमेचा चंद्र दाखवायचास 
आणि हस, म्हणून सांगायचास 
तोच चंद्र ..... तीच पौर्णिमा 
पण ......
तेच.... हसणं...  परत दे ....!

जेंव्हा जेंव्हा पाहत होते आरसा 
आरश्यात तुझ्या प्रतीबिंबेचा  कवडसा 
तोच आरसा .....  तीच मी ...
पण.....
तो कवडसा परत दे ......!

हातात आपण हात घेऊन 
आणा भाका किती घेतल्या ...
पुढे फक्त विरह आहे.
हे माहित असूनसुद्धा....! 
पण ....
विरह फक्त काढून घे      
आणा भाका मला दे.....!

सारेच आता राहू दे 
त्यापेक्षा एक कर 
आठवत असेल 
पहिली भेट 
तर ....
ती नजर .....
तो असर......परत दे......!!!!

२ टिप्पण्या :

  1. तुझ्याकडे माझे अधिक
    काही मागणे नाही......!

    हे म्हणत कवितेत पुढे बरेच मागणे आले आहे. थोडे विसंगत वाटले.

    "अधिक काही मागणे नाही" याचा अर्थ "थोडे मागणे आहे" असा घेतला तर कविता पुढे वाचताना सुसंगत वाटते.

    उत्तर द्याहटवा
  2. "अधिक काही मागणे नाही" याचा अर्थ "थोडे मागणे आहे" असा घेतला तर कविता पुढे वाचताना सुसंगत वाटते.
    yes ur right adi...! thank for comment...! see u on blogg

    उत्तर द्याहटवा