बुधवार, १० एप्रिल, २०१३

कोंडलेल्या आसवांनो

कोंडलेल्या आसवांनो
पावसात बरसायचे
ऋतूच्या या सोहळ्यात
एकटे नाही राहायचे ......!


     काय सांगावे पुढचे
     ऋतू येतील कोरडे
     दु:ख पडेल उघडे
     अनं  हसे तुमचे व्हायचे
कोंडलेल्या आसवांनो पावसात बरसायचे


     अति पावसाचे लाड
     नाही कुणी करीत
     आसवांनो तुम्हालाही मग
     नाही कुणी पुसायचे
  कोंडलेल्या आसवांनो
पावसात बरसायचे


     वहाता वहाता तुम्ही
     भानही ठेवायचे
     दूर कुठेतरी , कुणाचे
     घर आहे मातीचे
कोंडलेल्या आसवांनो
पावसात बरसायचे


   


काल, 12:30 6 comments

२ टिप्पण्या :

 1. काय सांगावे पुढचे
  ऋतू येतील कोरडे
  दु:ख पडेल उघडे
  अनं हसे तुमचे व्हायचे
  कोंडलेल्या आसवांनो पावसात बरसायचे

  सुंदर कल्पना!

  I love walking in the rain that's why nobody can see me crying! कवितेसाठी समर्पक फोटो!

  उत्तर द्याहटवा