सोमवार, १४ जुलै, २०१४

रात्र होते अनं .... !!


















रात्र होते अनं  ....
आपसूक गहिरी होते
तुझी सय   ....
गहिवरून जाते माझी सवय
कुशीत तुझ्या झोपण्याची    …!!

रात्र होते अनं   …
खिड़्कीतला चंद्र तो
चांदणे पसरतो    ....
तुझ्या माझ्या रिकाम्या बिछान्यावर   ....!!

रात्र होते अनं  ....
दाटते  छाती
पान्हा फुटतो हुंदक्यांना
अनं  … ओलीचिंब होते तुझ्या
चितेवरची  माझी
स्वप्नांची राख   ....!!!!

                                            "समिधा" 

४ टिप्पण्या :

  1. समिधा खुप दिवसांनी तुझी पोस्ट वाचायला मिळालीय. कविता छान झालीय.

    उत्तर द्याहटवा
  2. अंगावर काटा येतो वाचताना हि तुमची कविता!
    चांदणे रिकाम्या बिछान्यावर .............
    हुंदक्यांना पान्हा ...................
    ओलीचिंब चीत्वारची राख.......

    संवेदनेतून वेदना ...कळत नाही इतके विदारक पण चपखळ कसे लिहिता!
    keep it up!

    उत्तर द्याहटवा