सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

अर्धि कच्ची प्रेमकहाणी ....!

 

आता बसले वेचित दारी
फुले प्राजक्ती गुंफित वेणी
सोबत सारी आठवांची
अर्धि कच्ची प्रेमकहाणी   ....!


फूल फुलावे फांदीवरती
फांदीवर ते डुलत राहावे
कधी मधी यावे भुंग्याने
फूल फुलांतून उठून जावे  ....!


मी माझ्यातून मुक्त होऊनी
कधी पाहिले तुझ्यात नाही
द्यावे घ्यावे मूक क्षणांना
तेंव्हा काही कळले नाही   .....!


येता जाता नजर भिडता
हृदयी धड़धड़ किती बावरली
फुलपाखरी मिटुनी डोळे
हसुनि गाली वेळ दवडली  ....!


आले  क्षण  ते गेले क्षण  
पहाटवारे वहात राहिले
त्या स्मृतींचा धुंद गंध
ध्यानीमनी  अजुनी ल्यायले ....!


आता बसले वेचित दारी
फुले प्राजक्ती गुंफित वेणी
सोबत सारी आठवांची
अर्धि कच्ची प्रेमकहाणी   ....!


                                                 "समिधा"
















९ टिप्पण्या :

  1. प्रत्युत्तरे
    1. विद्याजी, आपण संदर्भ चित्राविषयी मत मांडलेत. पण लेखकाला लिखाणाविषयी जणून घ्यावयाचे असते. त्यामुळे यापुढे आपण काळजी घ्याल हि अपेक्षा.

      हटवा
  2. समिधाजी, मी वेळोवेळी आपल्या लिखाणाविषयी सुचना करत आलो आहे. यात मी किती शहाणा अथवा जाणता हे दाखवुन देण्याचा मुळीच हेतू नसतो. परंतु फार थोडी मंडळी नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार लिखन करतात. आपण त्यापैकी एक आहात. आपला विषय आणि आशय उत्तम असतो. आपली कविता शक्यतो विषय सोडुन वहावत नाही.अलंकार, वृत्त यचे ज्ञान मलाही नाही. अथवा त्या बंधनात अडकावे एवढे माझे शब्द सामर्थ्य नाही. परंतु यमक,मात्रा,प्रवाहीपणा,गेयता आणि प्रासादिकता या मुद्यांचा मी फार गांभीर्याने विचार करतो आणि आपली सारख्या प्रत्येकाने तो करावा से वाटते म्हणुन हा आचरटपणा. हि कविताही उत्तम आहे आहे. पण यमक,मात्रा,प्रवाहीपणा या बाबींचे भान अनेक ठिकाणी सुटले आहे. उदा. मी माझ्यातून मुक्त होऊनी
    तुझ्यात कधी पाहिले नाही
    द्यावे घ्यावे मूक क्षणांना
    तेंव्हा काही कळले नाही ..... या ओळी

    मुक्त होऊनी मी माझ्यातूनी
    कधी पाहिले तुझ्यात नाही
    द्यावे घ्यावे मुक्या क्षणांना
    तेंव्हा जराही कळले नाही .....

    आपल्या कवितेची निर्मिती प्रक्रिया माहित नाही. पण तुमच्या मनात कविता डोकावू लागते तेव्हा आपण कागद पेन समोर घेऊन बसत असाल असे वाटते. कृपया आपले मत व्यक्त करावे.

    उत्तर द्याहटवा
  3. समिधाजी, मी वेळोवेळी आपल्या लिखाणाविषयी सुचना करत आलो आहे. यात मी किती शहाणा अथवा जाणता हे दाखवुन देण्याचा मुळीच हेतू नसतो. परंतु फार थोडी मंडळी नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार लिखन करतात. आपण त्यापैकी एक आहात. आपला विषय आणि आशय उत्तम असतो. आपली कविता शक्यतो विषय सोडुन वहावत नाही.अलंकार, वृत्त यचे ज्ञान मलाही नाही. अथवा त्या बंधनात अडकावे एवढे माझे शब्द सामर्थ्य नाही. परंतु यमक,मात्रा,प्रवाहीपणा,गेयता आणि प्रासादिकता या मुद्यांचा मी फार गांभीर्याने विचार करतो आणि आपली सारख्या प्रत्येकाने तो करावा से वाटते म्हणुन हा आचरटपणा. हि कविताही उत्तम आहे आहे. पण यमक,मात्रा,प्रवाहीपणा या बाबींचे भान अनेक ठिकाणी सुटले आहे. उदा. मी माझ्यातून मुक्त होऊनी
    तुझ्यात कधी पाहिले नाही
    द्यावे घ्यावे मूक क्षणांना
    तेंव्हा काही कळले नाही ..... या ओळी

    मुक्त होऊनी मी माझ्यातूनी
    कधी पाहिले तुझ्यात नाही
    द्यावे घ्यावे मुक्या क्षणांना
    तेंव्हा जराही कळले नाही .....

    आपल्या कवितेची निर्मिती प्रक्रिया माहित नाही. पण तुमच्या मनात कविता डोकावू लागते तेव्हा आपण कागद पेन समोर घेऊन बसत असाल असे वाटते. कृपया आपले मत व्यक्त करावे.

    उत्तर द्याहटवा
  4. विजय शेंडगे यांची प्रतिक्रिया तथ्य असणारी आहे.
    समीधाजी,
    आपल्या बागेतून आपण हापुसचे पाडाचे आंबे तोडुन घरी आणतो. ते रसाळ आणि गोमटे होण्यासाठी आपल्याला आढी लावुन ते पिकवावे लागतात नां? मग कुठे रसिक खवैया रसास्वाद घेताना वाहवाही करतो.
    आपल्या काव्यात आशय ओतप्रोत आहे. पण presentation च्या बाबतीत आंबटगोड रहातेय ते काव्य !
    आपण आशयाच्या बाबत आणि विषयाच्या मांडणीत selective आहात . पण बांधणीकडे लक्ष दिल्यावर अधिक उत्कृष्ट व्हाल. सुचनांचा अतिरेक झाला असे वाटले तर माफी चाहतो.
    प्रमोद गानु.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रमोद सर , माझ्या अनेक लेखांना आपण अभिप्राय दिले आहेत. ब्लॉग पासुन फेसबुक पर्यंत आणि समाज सेवेपासून छायाचित्रणा पर्यंत आपला वावर पाहुन खुप आनंद वाटतो. आमच्या सारख्यांनी आदर्श घ्यावा असे आपले व्यक्तिमत्व.

      हटवा
    2. विजय शेंडगे सर आणि प्रमोद गानू सर तुमचे खुप खुप आभार ...! खरं तर मी कविता स्वानंदा साठी लिहिते असे म्हणणे आता मला शक्य नाही !

      कारण तुमच्या सारखे अनुभवी आणि उत्तम सखोल अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक आणि वाचक माझ्या सारख्या नव लेखीकेच्या लेखनाबाबत एव्हढया आत्मीयतेने आणि गंभीरतापूर्वक सूचनावजा मार्गदर्शनपर समीक्षा करतात तेंव्हा माझी लेखना बाबतची जबाबदारी वाढवणे आवश्यक आहे याचे भान मला मिळते ...! कारण माझे लेखन आपल्या सारख्या प्रगल्भ आणि विचारी व्यक्तिपर्यंत पोहचवतांना लेखनातील आपण दाखविलेल्या त्रुटिंबाबत मी विचार करणे आणि अर्थात त्यावरील अभ्यास करणे आवश्यक ठरते !

      मी तुमची अत्यंत आभारी आहे . माझ्या लेखन समृद्धीसाठी आपले मिळणारे मार्गदर्शन मला फार मोलाचे आहे ! असाच लोभ रहावा ही विनंती ...!!

      हटवा
  5. विजय शेंडगे सर आणि प्रमोद गानू सर तुमचे खुप खुप आभार ...! खरं तर मी कविता स्वानंदा साठी लिहिते असे म्हणणे आता मला शक्य नाही !

    कारण तुमच्या सारखे अनुभवी आणि उत्तम सखोल अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक आणि वाचक माझ्या सारख्या नव लेखीकेच्या लेखनाबाबत एव्हढया आत्मीयतेने आणि गंभीरतापूर्वक सूचनावजा मार्गदर्शनपर समीक्षा करतात तेंव्हा माझी लेखना बाबतची जबाबदारी वाढवणे आवश्यक आहे याचे भान मला मिळते ...! कारण माझे लेखन आपल्या सारख्या प्रगल्भ आणि विचारी व्यक्तिपर्यंत पोहचवतांना लेखनातील आपण दाखविलेल्या त्रुटिंबाबत मी विचार करणे आणि अर्थात त्यावरील अभ्यास करणे आवश्यक ठरते !

    मी तुमची अत्यंत आभारी आहे . माझ्या लेखन समृद्धीसाठी आपले मिळणारे मार्गदर्शन मला फार मोलाचे आहे ! असाच लोभ रहावा ही विनंती ...!!

    उत्तर द्याहटवा