शनिवार, ५ मार्च, २०१६

इतक्या वर्षांनंतर शेवटी ....!!




इतक्या वर्षांनंतर शेवटी
एकदा आपण भेटलो
त्या एका भेटीत
किती मागील - किती पुढील
कित्ती कित्ती बोललो  .....!
तुझी माझी आई कशी , बाबा कसे
आणि इतर सगळे ठीक का  ...?
आणि इतर मध्ये सगळे वगळून
कित्ती कित्ती बोललो  ....!!

तुझ्या माझ्या शब्दांमध्ये
पत्त्यांचा डाव होता
एक शब्द तुझा
आणि एक शब्द माझा होता
शब्दांमध्ये हरलो नाही
दोघेही आपण
हरले होते शब्द मात्र
तेंव्हा आपण थांबलो  .....!!!

बोलता बोलता डोळ्यांमध्ये
बरेच काही वाचले.
तुझे माझे आकाश तिथे
चांदण्यांनी व्यापले...
तरीसुद्धा एका कोप-यात
अश्रुंना रोखले....
अश्रुंना रोखतांना
पुन्हा पुन्हा हसलो  .....
इतक्या वर्षांनंतर शेवटी
पुन्हा एकदा हरलो    ....!!!!
पुन्हा एकदा हरलो    ....!!!!


                                            "समिधा"







३ टिप्पण्या :

  1. मफ करा पण खुप छान सुरवात करूनही शेवट मात्र साधलं नाही असे वाटते. आपण कविता पूर्ण करताना घाई करताय असे वाटते.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमचे निरिक्षण बरोबर आहे. विजय सर ! एखाद्या भावनेला योग्य शब्द नाही सापडला की केवळ कविता पूर्ण करण्यासाठी घाई होते हे खरे आहे ! योग्य शब्द सापडे पर्यंत धीर नसतो म्हणून हे बऱ्याचदा माझ्याकडून घडते !

      हटवा
  2. अशा वेळी ती कविता काही दिवस मागे ठेवली आणि शेवट नन्तर सापडला तर तेव्हा complete करावी. माहित नाही माझे हे सांगणेही किती संयुक्तिक आहे..

    उत्तर द्याहटवा