गुरुवार, ५ जुलै, २०१८

प्रिय...दिवस सुरू होतांना......!


 Beautiful painting.....

 प्रिय.......
रात्री पापण्या जड होतात  अनं  मग मनात तू दाटून येतोस....
खुप व्याकूळ असतं मन .....अनं  मनाला त्या शरीराचं भानही नसतं....!
पांघरूणाच्या आड पापण्या ओलावतात
त्या गारव्यातच स्वत:ला मिटून घेतात
स्वप्नांचे पंख मग त्यांना रात्रभर हवा देत रहातात.
पहाटेला जड पापण्या उघडताच .....
मनाच्या तळाशी असलेली तुझी लाट अधिर होऊन वर येते
अनं दिवसभर तिचे तरंग हेलकावत रहातात........
त्या तरंगांना कधी एखादी गाण्याची धुन, शब्दांचं गुंजन
कधी तुझंच स्मरण मंद हसवत रहातात.......!
जेव्हा एखादा रिक्त क्षणही तुझ्या स्मरणानं भरून ओसंडत असतो.....
तेव्हा तुझी ओढ अनावर होते....
तुला येऊन बिलगावं.......
अनं  हे सारं सांगावं असं वाटत असते.......
पण क्षणात व्याकुळ मनाला आवरून घेते......
अनं मग असे संवेदनांना शब्द फुटतात.......
प्रिय ..... तुला कळतंय ना......
याला काय म्हणतात.............!

@समिधा

४ टिप्पण्या :

 1. सुंदर ओघवत्या शब्दातील कविता !!!
  कुठेही यमक जुळवण्याचा प्रयत्न नाही त्यामुळे सरळ समोर कविता येते
  छान !!!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद आदीवीज जी... खुप दिवसांनी ईथे ........... :)

   हटवा