शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

"प्रेम"





प्रेमा तुझा रंग कसा ...? कुणी सांगू शकेल का...?

प्रेम तर निशब्दातूनच हळुवारपणे उलगडते...फुलते ...बहरते..!

प्रेमाची भाषा काय असते.? आपल्या नजरेतून पाझरणारी 

आणि.... आपल्याही नकळत हृदयाला भिडते ...! 

प्रेमाचा गंध कसा...? श्वासातून दरवळणारा ... ! 

प्रेमाचा स्पर्श कसा ..? या देहीचे त्या देही.... 

आंतरिक आठवणीतूनही जाणवणारा.....!!!!

" मन वाट वाट पाही ....."!




मन दूर दूर जाई 
दूर सख्याच्या गावी 
मन आतुर आतुर 
घाली दारात रांगोळी.....! 

मन वर वर जाई 
वर झोकात अंबरी 
मन झाले इंद्रधनू 
बांधी तोरण अंबरी.....! 

मन वाट ... वाट पाही 
वाट  झाली ग . . .  उदास 
मन कातर . . . .कातर . . .
घेई कुशीत . . . .आभास ....!

   

                                              समिधा