शनिवार, ५ मार्च, २०१६

इतक्या वर्षांनंतर शेवटी ....!!
इतक्या वर्षांनंतर शेवटी
एकदा आपण भेटलो
त्या एका भेटीत
किती मागील - किती पुढील
कित्ती कित्ती बोललो  .....!
तुझी माझी आई कशी , बाबा कसे
आणि इतर सगळे ठीक का  ...?
आणि इतर मध्ये सगळे वगळून
कित्ती कित्ती बोललो  ....!!

तुझ्या माझ्या शब्दांमध्ये
पत्त्यांचा डाव होता
एक शब्द तुझा
आणि एक शब्द माझा होता
शब्दांमध्ये हरलो नाही
दोघेही आपण
हरले होते शब्द मात्र
तेंव्हा आपण थांबलो  .....!!!

बोलता बोलता डोळ्यांमध्ये
बरेच काही वाचले.
तुझे माझे आकाश तिथे
चांदण्यांनी व्यापले...
तरीसुद्धा एका कोप-यात
अश्रुंना रोखले....
अश्रुंना रोखतांना
पुन्हा पुन्हा हसलो  .....
इतक्या वर्षांनंतर शेवटी
पुन्हा एकदा हरलो    ....!!!!
पुन्हा एकदा हरलो    ....!!!!


                                            "समिधा"