अस्वस्थ मनाच्या तळ|शी
एक अपमान … की अहंकार
दडपून ,
हसण्याचा माझा केविलवाणा
प्रयत्न …!
दगडाने मला ठेचले असते
तरी चालले असते …
पण पाठ वळवून तू
निघून गेल्यावर …
हसण्याचा तुझा उद्दामपणा …!
माझ्यावरचा तो घाव
तू परत आल्यावरही
भळभळुन वाहतोय …
निपचीत पडलय प्रेम
निरवंश झालेल्या
प्रेतासारखे …!!!