गुंत्यात सा-या गुंतवूनी
सहज त्याचे सांगणे ……!
गुंतू नकोस माझ्यात
बरे नव्हे गुंतणे ....... !!
खरंच ....
इतके सहज असते
रेशमी मखमली धागे
उसवणे ……??
खोल श्वास घेऊनी
देई अबोल हुंदका
खरंच ……
किती कठिण ते
अश्रुंना दटावणे ……!!
पाठ तुझी फिरता
झाली फितूर दुनिया
माझ्याही श्वासांना
जड झाले झेलणे ……!!!
येशील तू परतही
माझी खुशाली पुसण्या
काय सांगावे कसे
असेल आपले भेटणे .... !!!
तू तुझा अनं मी माझी
नाते असेल संपले
की जुन्या स्पंदनांना
जागवावे नव्याने ……???
"समिधा"