तुला मला माहीत आहे
जूने नाते संपले आहे .....!
तरी एकमेकांना
सामोरे जातांना
मनात हलकेच मोरपीस
फिरत नाही ....... तर
कुठेतरी .... काटेरी
कुंपणाचा वेढा
वाढत आहे ......!
ते काटेरी कुंपण
उखडण्यासाठी तरी
भेटावे ...........!
तुझ्या माझ्यातल्या नात्याला
काहीतरी 'नवे' नाव दयावे ........!!