तू दिसला नाहीस की,
किती शंका भितीचे काळे ढग
मनात दाटायचे,
मग मनातले
डोळ्यातून बरसायचे.....!
सारे माझे जीवाचे हाल
तूला ठाऊक असायचे
माझ्या अवतीभवतीचं रान
तुझ्या प्राजक्ती सुंगधानं थररायचे!
तुझ्याशिवाय रात्र फुरगूंटून
अंगणात बसायची....
अनं तेव्हाच नेमकं
आकाशात चंद्राने चांदणीला
कवेत घेऊन मिरवायचे !
दूर कुठेतरी जेव्हा दिवा
एकटाच जळत असतो
खरं सांगते सख्या
त्याभोवतीच्या काजळीने
माझे मन वेढायचे....!
खोटं खोटं रूसून
तू मला सतवायचास
माझे तुझ्या मागे मागे करणे
तुला फार आवडायचे....!
तुझ्या नकळत मी...
ते अत्तरक्षण जपून ठेवलेत
अधीर होते फारच जेव्हा
थोडे थोडे शिंपडायचे....!
मनात दाटून येण्याआधी
माझा सावळमेघ बरसेल
तो आवेग झेलण्यासाठी
तूळशीने अंगणी उभे रहायचे ..
"समिधा"