शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

: मागणे . . . .!!


तुझ्याकडे  माझे अधिक 

काही मागणे नाही......!
आता सारे संपले आहे.
अधिक काही सांगणे नाही....!

तू  पौर्णिमेचा चंद्र दाखवायचास 
आणि हस, म्हणून सांगायचास 
तोच चंद्र ..... तीच पौर्णिमा 
पण ......
तेच.... हसणं...  परत दे ....!

जेंव्हा जेंव्हा पाहत होते आरसा 
आरश्यात तुझ्या प्रतीबिंबेचा  कवडसा 
तोच आरसा .....  तीच मी ...
पण.....
तो कवडसा परत दे ......!

हातात आपण हात घेऊन 
आणा भाका किती घेतल्या ...
पुढे फक्त विरह आहे.
हे माहित असूनसुद्धा....! 
पण ....
विरह फक्त काढून घे      
आणा भाका मला दे.....!

सारेच आता राहू दे 
त्यापेक्षा एक कर 
आठवत असेल 
पहिली भेट 
तर ....
ती नजर .....
तो असर......परत दे......!!!!

" माझा मीच ......!ऋतू बरसून गेला ,  मागचा उरलेला  वादळ मी आहे .
वाहून गेले पाणी , खालचा रुतलेला गाळ मी आहे .!!

प्राक्तनात माझ्या उरणेच आता उरले 
हृदयातील ही सल , खोल घायाळ मी आहे .!!

होऊन सा-या जगाचा उरेन म्हणतो  मी 
पाहून व्यवहार त्यांचा , वाटे माझा मीच पुष्कळ आहे .!!!

" आता कळते मला ......!

शोध घेता मी 
माझ्या स्रीत्वाचा 
प्राक्तनात जिच्या सदैव 
आरोप दुभंगलेपाणाचा 

उंबरठ्याच्या अल्याड म्हणे 
विश्व माझे उभे 
पल्याड तुझे काय आहे ....?
पोकळ आकाश रिकामे.

म्हणतात-
तू  गरुड ,ना घारही 
का वृथा शोध घेते....?
दुख:चा भार वाही ....?

हो .....! कळते मला 
मी ना गारूड , ना घारही 
पण तरीही म्हणते- 
चिमणी होऊन 
आकाशी झेप घ्यावी .....!

फुलपाखराला पंख 
दैवाने कारणाशिवाय 
दिले नाहीत 
माझ्या स्रीत्वाचा अपमान 
करू नका 
माझ्याशिवाय पर्याय नाही ...!

आता कळते मला 
नाती नाहीत बेड्या 
अडकून पडण्यासाठी 
दारे खिडक्या बंद करून 
गंजून जगण्यासाठी 

कळते तुम्हाला .....?
स्रीत्व म्हणजे केवळ 
बाई नाही 
आई आहे ...!
स्रीत्व म्हणजे
भोग नाही 
आग आहे 

आता कळते मला 
स्रीत्व माझे फेडण्यासाठी 
मीच शक्ती झाले पाहिजे 
अस्तित्व माझे मिटण्यापूर्वी 
मीच मला रोवले पाहिजे.......!
मीच मला रोवले पाहिजे.......!

तुझ्या दिलेल्या वचनांचे ....!
तुझ्या दिलेल्या वचनांचे 
एक एक काळे मणी 
अंतरात जपून 
ठेवले आहेत .......!
तूला  आठवतही नसेल आता 
पण एकत्र घेतलेल्या अगणित 
श्वासांची शपथ.....!
तुझ्या बरोबर चालेल्या 
प्रत्येक पावलात सप्तपदींचे 
मंत्र जपत होते......!
तू परतणार नाहीस 
तरीही 
तुझ्या नावानेच 
आयुष्याचा उत्सव साजरा 
करणार आहे...!
तू नसतांना ... पण तरीही 
कुठेतरी तुलाच शोधतांना 
अंतरगाभा-यात प्राण तेवत 
आहे...!

कोरा कागद ....!को-या कागदावर 
कोरली शब्दांची लेणी 

अभंगात आहे आनंद भक्तीभाव 
भक्तिरसात घेते अद्वैताचे ठाव !

मनविभोर, मोहक , आनंदाचे डोह 
भावगीतात भेटते स्वप्नांचे गांव  !

लेऊन शृंगार होते चिरतारुण्य जाणीव 
लावणीत भेटते कवीची कवितेकडे धाव...!