शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

" दे जरा हात तू नव्या पालवीचा ...."
मी  तुला अनं तू मला
का ओळखीचे होऊन पहावे   ....?
खुप झाले खरे खोटे बहाणे
का आता जुन्या स्मृतीना स्मरावे   ..?
दे जरा हात  तू नव्या पालवीचा   ....
मीही फूलून येईन नव्याने   .... !
का आता जुन्या मुळाशी व्यर्थ खेळावे   ....?
देहात तुझ्या नव्या स्पंदनांना वाहु दे
मलाही जमेल आता भावंनांना समजावणे
का वृथा घालमेल ही जीवांची , सारे सावरावे   ..
मी तुला अनं  तू मला
पुन्हा नव्याने भेटावे   ....!!!
पुन्हा नव्याने भेटावे   .... !!!


                                                 " समिधा "