गुरुवार, ९ मे, २०१३

"गुलमोहर "
दारातला गुलमोहर
पाहीला की ,
मनातला  वसंत
फुलून येतो .........!
अनं-
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
विझवून जातो .....!

रक्त आरक्ति
गुलमोहरी गालिचा
आठवला की,
मनातला शृंगार
खुलुन येतो…… ..!
अनं-
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
विस्कटून जातो .....!

या गुलमोहराला
रोज सांगत असते
मनातले गुज
आपल्यातले हितगुज
सारेच तो ऐकून घेतो ....!
अनं -
मग असा
बहर उधळतो
गुलमोहरी
गालिचा पसरतो ........!
अनं -
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
माझ्याही नकळत
"वसंत " होतो ............!


                                   समिधा