क्षण काही वेचलेले
क्षण काही हरवलेले
भेटीत तुझ्या सख्या रे
मन माझे गुंतलेले ........!
चांदण्यांचे हात तुझे
गुंफुनि गळ्य़ात माझ्या
डोळ्यांत नक्षत्रांचे देणे
अनं - मन माझे बावरलेले ......!
पाहून दूर क्षितीजा
येई जवळ तुझ्या
व्याकुळ विरही वेदनेने
मन माझे घाबरलेले ..........!
चांदण्यांचे हात तुझे
हातात मी घेतले
तुझे नक्षत्रांचे देणे
मी ओठांत गुंफलेले ...........!!!!!
मी ओठांत गुंफलेले ...........!!!!!
" समिधा "