आज कित्ती कित्ती दिवसांनी भेटतोस ....!!
आणि असा काय पाहतोस …?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस …??
हं …
मोग-याला ओंजळीत घेऊन चुंबताना
धुँवाधार पावसाला मिठीत घेऊन भिजतांना
चंद्राकड़े एकटक पाहुन …
हळूच त्याला फ्लाइंग किस देतांना ....
तू मला पाहिलं तर नाहीस ....?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का
केलंस ....??
हं …
कित्ती कित्ती तुला मी सर्च केलं
पण ... कुठे नाही भेटलास ....
मग तू कधी मोग-यांच्या पाकळ्यांत
पावसाच्या मिठीत गवसलास
तर कधी चंद्राच्या कुशीत दिसलास … !!
हं ....
इतका रे कसा तू जेलस …!
इतकंच का मला तू ओळखलंस ....?
म्हणूनच का मला टाळलंस …
म्हणूनच आले तुझ्या स्वप्नात ....!!
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस ....??
" समिधा "
समिधाजी, तुमचा अपमान करण्याचा हेतु नाही. पण तुमचे जे लेखण मी आजवर वाचले आहे त्यानुसार हि कविता तुमची वाटू नये इतकी अप्रतिम झालीय. पण हि कविता तुमचीच आहे असा विश्वासही आहे. केवळ खुप छान, अप्रतिम या शब्दात या कवितेचं मूल्यमापन करणं शक्य नाही.
उत्तर द्याहटवाDhanyvad Vijay sir..!
" Thodasa moodmadhe
change aanun pahila..!
nehamich virahi virani ganyapeksha
virahatahi thodasa dam
deun pahila...!!!! " :)
ya kavitet mi ajachya tarunaichya moodmadhye, tyanchya
bhashet tyanchya bhavana vyakt karnyacha prayatna kela
aahe..! aani to tumachya pratikriyevarun yashaswi jhalyasarkhe
vatate...!! :)