तू तुझ्या विश्वातले
रंग उधळीत
आलास माझ्याकडे
मीही कशी रंगवेडी
सारेच रंग ल्यायले
अंगभर .....
भान माझे सुटले
वेढिले मी तुला ....
अनं वा-यावर शुभ्रधवल
डागाळलेला पदर मोकळl ...........!
समिधा
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले