गुरुवार, २३ मे, २०१३

तू गेल्यानंतरही .............!
तू गेल्यानंतर ..........
अनेकांचे माझ्या मनावर
झालेले बलात्कार ...........!
तू होतास ......
तुझ्यात माझे अस्तित्व ......?
जरी तू कधीच मानले
नाहीस .........!
म्हणूनच ........ तू गेल्यानंतर
त्यांची हिम्मत झाली ..... बोलायची
मिळते ते फुकटचे ........! कारण
त्यांना हवा होता ........
तू केलेल्या षंढ बलात्कारातुन
त्यांच्या वंशाचा दिवा ........
जो मी नाकारला ........!
माझ्या अस्तित्वासाठी .........!

     तू असतानाही
     वाचवत होते मी
     माझ्या अस्तित्वाला .......
     तरीही .........
     तुझ्या भिरभिरत्या
     नजरेच्या एखाद्या फांदीवर
     लटकुन .......
     पहात होते ............ मी
     मायेचा झोका देतोय का ......?

तू गेल्यानंतर .......
मौनात जपलेल्या तुझ्या
रक्तबंबाळ खुणा ......
वाहू लागल्या .........
वेदना ,यातनांचा कढ
डोळ्यातून पाझरु लागला .....!
निशब्द होत होत ....
पूर्ण माझ्या अस्तित्वात
भिनला .......!

     तू गेल्यानंतरही
     मनावरचे बलात्कार
     चालूच आहेत ..........!
    आता वठलेल्या वृक्षांनाही
    नवी पालवी फूटते ........
    वेलींना  नवे  कोंब
    फुटुन ......
    माझ्या तटस्थ मनाला
    वेढायला लागल्या आहेत .......!

तू गेल्यानंतरही .............
तू गेल्यानंतरही .............!
तुझे अस्तित्व असे
इथे -  तिथे ..........!
सरपटतांना दिसते ........!!!!!


                                              समिधा