सोमवार, २४ जून, २०१३

"तू तिथे ...... अनं मी इथे" ....!
तू तिथे ......
अनं  मी इथे ....!
आपल्यामध्ये ....... आपली
स्वप्ने ............!
काही तू पाहिलेली
काही मी पाहिलेली.....!
तू पाहिलेली स्वप्ने
फुलपाखरु होउन
माझ्या डोळ्यांच्या
पाकळ्यावर बसतात
आणि माझ्या
स्वप्नांचे मधुकण
घेउन तुझ्या
डोळ्यांत  फुलतात ......!
तू तिथे ......
अनं  मी इथे .....!
असलो तरी .....
तुझ्या ..... माझ्या
प्रेमाचे
मधुकण असे
अणु  रेणूत ......
आसमंत व्यापतात ......!
तू तिथे ......
अनं  मी इथे .....
तरीही एका
अस्वस्थ ......
पण .... आश्वस्थ  .....!
जाणिवेने .... एकमेकांना
बांधतात ........!!!!!


                                          समिधा