माझी मैफल संपली होती
पण भ्रमात मी होती
अखेरची भैरवी अजुन बाकी होती …!
मैफिलीत माझ्या
अनेक यती - जाती
छेडून , तर कधी सुर
तोडून जाती
अखेरची भैरवी अजुन बाकी होती …!
मैफिलीत साथ
माझी मलाच होती
एकांती एक पण अनेकांतही
एकटी होती
अखेरची भैरवी अजुन बाकी होती …!
भैरवीत व्हावा अंत
इच्छा अंतिम होती
पण लावून कुणी ज्योत
पहाट उजळत होती
अखेरची भैरवी अजुन बाकी होती …