काही आठवणी
किती हाकलाव्या तरी
फिरून येतात ...........
आणि चिटकुन राहतात
गोचिडासारख्या … आत्म्याला
आणि पीत रहातात जीवनरस ....!!
आणि बाहेर ....
समाज नावाचा ढेकुण
टोचत बोचत शोषत रहातो
आणि पोसत राहतो … त्यांना
खेचत नेतात मला मृगजळात .... !!!
मग … जगणेच होतो फास …
आणि आवळत रहातो
आस्तित्वाचे पाश … !!!
हताश हतबल मनाचे हात
खेचत रहातात त्यांच्यापासून .... !!
खोल खोल काळ्या डोहात
बुडवाव्या त्या आठवणी
तर त्या मलाच घेऊन
बुडतायत मृगजळात …!!
मीच मला अनोळखी होते
माझ्याच अंतरगाभा-यात …!!
हळुहळु मग
त्यांचेच होतात भास्
आसपास …!
आणि मग कधी भासात
तर कधी सत्यात जगत रहाते
भास् आभास सत्य यांच्यात
फिरत रहाते
निरंतर अविरत ……
माझ्या निरथर्क
अस्तित्वाला पहात …!!!!
"समिधा "
हळुहळु मग
उत्तर द्याहटवात्यांचेच होतात भास्
आसपास …!
आणि मग कधी भासात
तर कधी सत्यात जगत रहाते
भास् आभास सत्य यांच्यात
फिरत रहाते
निरंतर अविरत ……
माझ्या निरथर्क
अस्तित्वाला पहात …!!!!
खोल खोल काळ्या डोहात
उत्तर द्याहटवाबुडवाव्या त्या आठवणी
तर त्या मलाच घेऊन
बुडतायत मृगजळात …!!
मीच मला अनोळखी होते
माझ्याच अंतरगाभा-यात …!!
excellent !
Thanks Datar Sir...!! na chukata mala pratikriya deun majhya praytnana cheer up karata....! Thanks !!
हटवाकविता म्हणजे
उत्तर द्याहटवासारा भोवताल सोसणं असतं
कविता म्हणजे
आपणच आपल्याला उसवण असतं
एक कविता म्हणजे
एक टाका असतो आपण घातलेला
कविता म्हणजे प्राण असतो
दगडामध्ये ओतलेला
माझ्याच एका कवितेतल्या सगळ्या अनुभूती तुमच्या या कवितेत सापडल्या. छान झालीय कविता.
Thanks Vijay ....! tumachya kavitechya oli tar apratimach ...! mala hi kavita purn vachyala nakki aavadel...!
हटवाApratim... such a amazing truth... !!
हटवाThanks a lot Vinod ji
हटवाkitihi pusayachya mhatalya tari aathavanihi nahi visarata yet.....mhanunach tar tyana aathawan mhanatat.........kitihi dur thevale samajala tari samajatach aapalyala rahayachey..........aapalyalahi jagayala samaj lagatoch........j
उत्तर द्याहटवा