सोमवार, १६ जानेवारी, २०१७

जरा जराशी मीही उरले तुजपाशी........!


जरा जराशी मीही उरले तुजपाशी
जरा जरासा तुही उरला मजपाशी....!

 

 

शुभ्र चांदणे अंगावरी पांघरले होते
तेच चांदणे दोघे अजुनही घेतो उशाशी...!

 

 

मंदिराचा चौथरा अनं रातराणीचा पार
ओघळणारा प्राजक्तही जपला खोल श्वासांशी...!

 

 

इथे घेतला श्वास अनं तिथे सोडला निश्वास
हाच दुवा अजुनही जोडतो दोघांच्या प्राणांशी...!

 

 

किती खोदल्या दोघांनी स्मरणांच्या खाणी
फक्त उसासे आणि दिलासे अजुनही तळाशी...!

 

 

विरहाचे ते गाणे अनं अंतरातला टाहो
अजुनही घुमतो इथेतिथे दोघांच्याही ह्रदयाशी

 

 

                                                   © "समिधा "