काही तुला सांगावे .... !
काही तुझे ऐकावे …!
पुरे झाले एकमेकां पहाणे
मौनात गेले कितीक दिसराती
शब्दांचे झूले मनातच झूलती …!
कधीतरी स्फुरावे अंतरंगी स्वरांना
तुझ्या माझ्यातले मौनातले गाणे ....!
असा सडा शब्दांचा पडावा
मोहरून जावीत झाडफुलपाने
अनं …तशातच माझे लाजुन हसणे …!!!
" समिधा "