तो असाच अवचीत भेटला
गाभुळल्या नजरेला दिसला .... !!
इवल्या इवल्या भेटींनी
मनात व्यापून बसला .... !!
तो असाच अवचीत भेटला .
चिमटीमधुनि फुलपाखरु
अलगद निसटावा
तो असाच अवचीत विरला .
पण मागे उरला
रंग मुलायम हृदयी रुतलेला !!
तो असाच अवचीत विरला .
"समिधा "