चंद्राच्या डोळ्यांत
तुझ्या-माझ्या किती भेटी
साठलेल्या ..... गोठलेल्या ......!!!
जेंव्हा जेंव्हा चंद्र पहाते
त्याच्या प्रकाशातुन
त्या झिरपतात , माझ्या मनात ,
अंतरात ......
आणि रहातात बिलगलेल्या ......
तो बघ चंद्र आणि हस पाहू ......!!!
असं तू म्हणायचास .........
आजकाल मला असं एकटीलाच
बघून .....तो माझ्यावर
हसल्याचा भास् होतो ........
मग मीच आताशा
आमावास्येला बाहेर पडते…
आणि एरवी ......
तो बाहेर पडायच्या आत
घरात येते .....
लपंडाव किती ,कुठवर .....?
चंद्राला ग्रहण लागले की .........
पहिलं दान तुझेच मागेन ......!