माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४
सांग कसे विसरायचे त्या हळुवार क्षणांना …!!
सांग कसे
विसरायचे त्या
हळुवार क्षणांना …!!
अलगद येऊन बिलगतात
माझिया मनाला ....!!!
स्पर्शून जातो
वारा …
अनं गंध तुझा येतो … !
क्षणिक रिमझिमल्या
मनाला
रंगात न्हाऊन जातो … !!
मग -
तुला भेटाया
मन काहुर काहुर होतो
अनं -
क्षितिजावर पहाते
तुझा रंग बदलेला …!!!
परि -
पाहुन रंग
तुझा तृप्त
मनी अतृप्त
मी न राहते
ठाऊक असे मजला
आतला रंग , रंगातला ....!!
"समिधा"
शनिवार, १९ जुलै, २०१४
सोमवार, १४ जुलै, २०१४
रात्र होते अनं .... !!
रात्र होते अनं ....
आपसूक गहिरी होते
तुझी सय ....
गहिवरून जाते माझी सवय
कुशीत तुझ्या झोपण्याची …!!
रात्र होते अनं …
खिड़्कीतला चंद्र तो
चांदणे पसरतो ....
तुझ्या माझ्या रिकाम्या बिछान्यावर ....!!
रात्र होते अनं ....
दाटते छाती
पान्हा फुटतो हुंदक्यांना
अनं … ओलीचिंब होते तुझ्या
चितेवरची माझी
स्वप्नांची राख ....!!!!
"समिधा"
शनिवार, २९ मार्च, २०१४
"" मृगजळ "" …?

काही आठवणी
किती हाकलाव्या तरी
फिरून येतात ...........
आणि चिटकुन राहतात
गोचिडासारख्या … आत्म्याला
आणि पीत रहातात जीवनरस ....!!
आणि बाहेर ....
समाज नावाचा ढेकुण
टोचत बोचत शोषत रहातो
आणि पोसत राहतो … त्यांना
खेचत नेतात मला मृगजळात .... !!!
मग … जगणेच होतो फास …
आणि आवळत रहातो
आस्तित्वाचे पाश … !!!
हताश हतबल मनाचे हात
खेचत रहातात त्यांच्यापासून .... !!
खोल खोल काळ्या डोहात
बुडवाव्या त्या आठवणी
तर त्या मलाच घेऊन
बुडतायत मृगजळात …!!
मीच मला अनोळखी होते
माझ्याच अंतरगाभा-यात …!!
हळुहळु मग
त्यांचेच होतात भास्
आसपास …!
आणि मग कधी भासात
तर कधी सत्यात जगत रहाते
भास् आभास सत्य यांच्यात
फिरत रहाते
निरंतर अविरत ……
माझ्या निरथर्क
अस्तित्वाला पहात …!!!!
"समिधा "
शनिवार, ८ फेब्रुवारी, २०१४
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)


.jpg)
