बुधवार, १६ जानेवारी, २०१३

तुझ्या बरोबरचे काही क्षण


तुझ्या बरोबरचे काही क्षण


पाखरांसारखे उडून जातात ,


काही काट्यांसारखे रुतून


बसतात,


हिंदोळ्यावर झोके घेत


काही नुसतेच रेंगाळतात .....


काही क्षण मुके,अबोल,


मनस्वी होतात .....!


किती वाट  पहावी म्हणून 


काही क्षण स्वत:लाच 


मिटून घेतात ......!!!!!




                                            समिधा 




1 टिप्पणी :

  1. किती वाट पहावी म्हणून काही क्षण स्वतःलाच मिटून घेतात......
    खूप छान कल्पना!
    (कासवाच्या तोंडासारखे आपल्याच घरात मिटून घेतात!)

    उत्तर द्याहटवा