त्याला पंचवीस वर्षे लोटली
या लोटलेल्या दिवसांची
पानं उलटली .......
नुसतीच फरफट दिसली .....
चार वर्षात गाठीवर चार गाठी
आणि वंशवृद्धीची
वेस गाठली.........!
पण .....
आपण आहोत तिथेच आहोत
एकमेकाना समजून घेतांना
तुझी रड , तुझा बहाणा
माझी रग , कधी केविलवाणा.
आपली गाठ घट्ट आहे..
हा नुसताच हट्ट आहे ...!
वरच्या गाठी सैल
होत नाहीत .....
तो पर्यंत
अशीच .... अशीच...एकमेकांशी
गाठ आहे....!!!
आपली गाठ घट्ट आहे..
उत्तर द्याहटवाहा नुसताच हट्ट आहे ...!
छान आहे.
हा घट्ट'चा हट्ट फक्त जगदेखला आहे.
शेवटी जगासाठी दोघे असून मनासाठी एकलीच/एकला आहे.
thanks adi..!
उत्तर द्याहटवा