दारातला गुलमोहर
पाहीला की ,
मनातला वसंत
फुलून येतो .........!
अनं-
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
विझवून जातो .....!
रक्त आरक्ति
गुलमोहरी गालिचा
आठवला की,
मनातला शृंगार
खुलुन येतो…… ..!
अनं-
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
विस्कटून जातो .....!
या गुलमोहराला
रोज सांगत असते
मनातले गुज
आपल्यातले हितगुज
सारेच तो ऐकून घेतो ....!
अनं -
मग असा
बहर उधळतो
गुलमोहरी
गालिचा पसरतो ........!
अनं -
तुझ्या विरहाचा
ग्रीष्म तो ,
माझ्याही नकळत
"वसंत " होतो ............!
समिधा
chaan aahe... pan mala watate mee kuthe tari wachalay he..
उत्तर द्याहटवाkhupach sundar varnan !!
उत्तर द्याहटवातुझ्या विरहाचा
उत्तर द्याहटवाग्रीष्म तो ,
माझ्याही नकळत
"वसंत " होतो ............!
khhooopach chhan shevat!
मनातले गुज
आपल्यातले हितगुज गुलमोहर ऐकून घेतो...बाकी कोणी ऐकून घेत नाही हो ना?