रविवार, १२ मे, २०१३

चंद्राला ग्रहण लागले की .........!




चंद्राच्या डोळ्यांत 

तुझ्या-माझ्या किती भेटी 

साठलेल्या ..... गोठलेल्या ......!!!

जेंव्हा जेंव्हा चंद्र पहाते 

त्याच्या प्रकाशातुन 

त्या झिरपतात , माझ्या मनात ,

अंतरात ......

आणि रहातात बिलगलेल्या ......

तो बघ चंद्र आणि हस पाहू ......!!!

असं तू म्हणायचास .........

आजकाल मला असं एकटीलाच 

बघून .....तो माझ्यावर

हसल्याचा भास् होतो ........

मग मीच आताशा 

आमावास्येला बाहेर पडते… 

आणि एरवी ......

तो बाहेर पडायच्या आत 

घरात येते .....

लपंडाव किती ,कुठवर .....?

चंद्राला ग्रहण लागले की .........

पहिलं  दान तुझेच मागेन ......!

४ टिप्पण्या :

  1. मग मीच आताशा
    आमावास्येला बाहेर पडते…
    आणि एरवी ......
    तो बाहेर पडायच्या आत
    घरात येते .....


    याला परिस्थितीपासून पळून जाणे म्हणायचे कि होणाऱ्या यातना कमी करणे म्हणायचे? आठवणींचा त्रास नको हा हव्यास कि काय माहित नाही. पण यातून बरेच काही कळते.

    तसेच

    तो बघ चंद्र आणि हस पाहू ......!!!
    असं तू म्हणायचास .........

    आणि

    आजकाल मला असं एकटीलाच
    बघून .....तो माझ्यावर
    हसल्याचा भास् होतो ........

    ह्या दोन्ही मधल्या हसण्यात फरक खूप आहे. एकामध्ये प्रियकराचे प्रेम तर दुसऱ्यामध्ये ते मिळत नाही म्हणून चंद्रच आपल्यावर कुचेष्टेने हसतोय हे आहे. एकाच शब्दाचा दोन ठीकांनी किती समर्पक अर्थ आहे. वाह! खूप मस्त!

    उत्तर द्याहटवा