क्षण काही वेचलेले
क्षण काही हरवलेले
भेटीत तुझ्या सख्या रे
मन माझे गुंतलेले ........!
चांदण्यांचे हात तुझे
गुंफुनि गळ्य़ात माझ्या
डोळ्यांत नक्षत्रांचे देणे
अनं - मन माझे बावरलेले ......!
पाहून दूर क्षितीजा
येई जवळ तुझ्या
व्याकुळ विरही वेदनेने
मन माझे घाबरलेले ..........!
चांदण्यांचे हात तुझे
हातात मी घेतले
तुझे नक्षत्रांचे देणे
मी ओठांत गुंफलेले ...........!!!!!
मी ओठांत गुंफलेले ...........!!!!!
" समिधा "
अतिशय सुरेख आणि शृंगारिक कविता
उत्तर द्याहटवाwaah samidha ji.. chaan aahe kavita... bit romantic one!!
उत्तर द्याहटवाक्षण काही वेचलेले
उत्तर द्याहटवाक्षण काही हरवलेले
भेटीत तुझ्या सख्या रे
मन माझे गुंतलेले ........!khupach sundar varnan...........
चांदण्याचे हात गळ्यातून सुटून हातात येतात किवा हातातून सुटून गळ्यात येतात. डोळ्यातले नक्षत्रांचे देणे कधी नकळत ओठात गुंफले कळलेच नाही... तुमची तीच कल्पना (चांदण्याचे हात किवा नक्षत्रांचे देणे) वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. या पूर्वी हि मी असेच तुमच्या काही कवितांमध्ये पाहिले आहे. छान! keep it up!
उत्तर द्याहटवाThanks to all my friends...!
उत्तर द्याहटवातुझे नक्षत्रांचे देणे
उत्तर द्याहटवामी ओठांत गुंफलेले....
अतिशय सुरेख कविता !!!
Thanks for comment ...Datar sir.....!
उत्तर द्याहटवाkhup chan ahe kavita
उत्तर द्याहटवाThanks to all my friends....!
उत्तर द्याहटवा