अश्या फितूर वेळा आल्या पुरते बुडालो असतो
सावरले नसते स्वतःला नजरेतून उतरलो असतो …!!
भेट क्षणाचीच होती पण परत भेटलोच नसतो
प्रेमाचा उच्चारही निघता पुरते बिथरलो असतो .... !!
तू , मी अनं वेगळ्या वाटा दूर राहूनही भंगलो असतो
सावरलो म्हणून आजही हृदयाचा हृदयी संवाद असतो …!!
मी तुला अनं तू मला आज दुवा देत राहिलो नसतो
कळलेच नसते जर कधी प्रेमाला वासनेचा शाप असतो …!!!
" समिधा "
Mast.
उत्तर द्याहटवाछान कविता...
उत्तर द्याहटवाप्रेमाला वासनेचा शाप असतो…!!!
अगदी १००% खर.....
खूप छान आणि सुंदर ओळी अगदी मनाला भारावून सोडणार्या
उत्तर द्याहटवाखूप छान आणि सुंदर ओळी अगदी मनाला भारावून सोडणार्या
उत्तर द्याहटवा