हातात हात घालून चालतांना
वाटलेच नाही
सुटतील कधी !
एक एक स्वप्न जोडतांना
वाटलेच नाही
तुटतील कधी !
फार लांबवर
चाललोच नाही
स्वप्न घेऊन उराशी
असे कसे हरलो आपण
नियतीशी लढलोच नाही !
हात होते सुटलेले
स्वप्न होते तुटलेले
डोळा तुझ्या होते पाणी
मी मात्र स्तब्ध होते
तुझ्या माझ्यात फक्त
आता निःशब्द शब्द होते
निःशब्द शब्द होते …!!
" समिधा "
छान लिहिलेत. पहिले कडवे सर्वोत्तम.
उत्तर द्याहटवानिशब्द करण्याइतपत अप्रतिम.
उत्तर द्याहटवाASE kase harlo aapan.. Niyatishi ladhloch nahi.... Khuup chhan
उत्तर द्याहटवानिशब्द शब्द होते खुप छान
उत्तर द्याहटवावेल डन समिधा.. खरोखरीच छान... एका वेगळ्या जगात नेणारे व निःशब्द करणारे शब्द...
उत्तर द्याहटवा