गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

" भावओले तुझे डोळे ...... "

 
भावओले तुझे डोळे
ह्रदयात उतरले....
कळलेच नाही
कधी हाती हात तुझे  आले....!

शब्दांची अडखळली पाऊलवाट
भावनांचे चंद्रचांदणे  पसरले
कळलेच नाही
कधी ईथवर आली नि:शब्द पाऊले....!

ह्रदयी धडधड अबोल गाणी
कितीक विरह अव्यक्तात जपले
कळलेच नाही
कधी तुझे मन माझ्या मनी उतरले...!

प्रित गातसे विरह विराणी
ह्रदयी स्मृतींचे वसंत जपले
कळलेच नाही
कधी दारी गुलमोहर बहरले.....!!!


                                                 " समिधा "

७ टिप्पण्या :

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद मैडम !अगदी खरे आहे ! हा फोटोच इतका बोलका आहे की त्यावर लिहावेसे वाटते...!

      तुमचेही चित्रांवरील काव्य आणि भाष्य अप्रतिम असते...!

      हटवा
  2. APRATIM !! ATISHAY SUNDER LIHTA TUMHI ....
    SUREKH SHABD MANDNI MANALA SPARSHUN JATE...
    SHUBH PRABHAT!!!

    उत्तर द्याहटवा