सोमवार, १४ मार्च, २०१६

राधेची मनबाधा .....!!



 radha साठी प्रतिमा परिणाम

तू तुझ्या उंबर-याशी घट्ट
पकडून, जखडून होतीस  ....
तरी तू सुरेल बासरीच्या
सुरांमागे धावत गेलीस  .....!
त्या घननिळ्या  प्रकाशांत
भावभक्तीने बुडतांना  ....
मागे किती झाला असेल
अंध:कार , हाहाकार  .... !
परतीचा उंबराही जळून गेला असेल  ....! 
तरीही तू ओलांडलेले ठसे
काळवंडले नाहीत   ...!!


                                               
                                             " समिधा "

५ टिप्पण्या :

  1. खूप छान.

    राधेची दुसरी बाजू कधी कोणी स्पष्टपणे इतिहासात सांगितली नाही.. तिचे कृष्णावरचे प्रेम मात्र खुप अधोरेखित केले गेले. तुम्ही इथे ती बाजू थोडक्यात पण प्रघल्ब्तेने लिहिलेत...

    मागे किती झाला असेल
    अंध:कार , हाहाकार .... !
    परतीचा उंबराही जळून गेला असेल ....!

    पण त्याच वेळी तिचे प्रेम किती सात्विक होते हे शेवटच्या कडव्यात सांगितलेत ....


    तरीही तू ओलांडलेले ठसे
    काळवंडले नाहीत ...!!

    खूप छान !!!!!!!!!!!!!!

    उत्तर द्याहटवा