गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

तू जाऊ नको सखे......






तू  जाऊ  नको सखे,

का दीन हा मावळला

मावळल्या सांज  दिशा

अनं परतीच्या  पावलांची

हळवी झाली भाषा  ....!!

तुझी भेट अशी  सखे ,

चांदण्यातली हळुवार मीठी 

पापण्यांवर ओठांची नक्षी 

तू मोहरलेली  अंतरंगी 

मी अधीर मनी  ... 

अनं अशा हळुवार क्षणी 

तुझी जाण्याची भाषा    .... !! 

अनं परतीच्या पावलांची

हळवी झाली भाषा  ..... !!

तू भेट अशी सखे,

निरंतर लाटेसारखी

आवेग भरतीचा असुदे 

किनारी मीलनाचा सोहळा

अनं अशा हळुवार क्षणी 

नको निघण्याची  भाषा    .... !! 

अनं परतीच्या पावलांची

हळवी झाली भाषा  ....!!

 

                           " समिधा "  














३ टिप्पण्या :

  1. परतीच्या पावलांची
    हळवी झाली भाषा ....!!

    चांदण्यातली हळुवार मीठी
    पापण्यांवर ओठांची नक्षी

    खूप छान कल्पना!!!!

    उत्तर द्याहटवा
  2. तुझी जाण्याची भाषा .... !!

    नको निघण्याची भाषा .... !!

    मला वाटते परत परत त्याच गोष्टी repeat झाल्या आहेत अर्थ हि न बदलता... इथे improvements ना जागा आहे...

    तसेच

    कविता नादमधुर आहे पण तिला यमकामध्ये बांधण्याचा प्रयत्न करा.. अजून कविता छान होईल....

    उत्तर द्याहटवा