शुक्रवार, १३ मे, २०१६

"किती जीव घेणे...!"


 

तुझे लाजणे हे

किती जीव घेणे...!
लाजतांना पहाणे
किती जीव घेणे ....!

 

एकांती नको हा
असा दुरावा
दुरावा सहाणे
किती जीव घेणे...! 

 

फुलू दे मुग्ध ओठी
शब्दांचे चांदणे
चांदण्यात नहाणे
किती जीव घेणे...! 

 

तुला रोज पहातो
तू फुलते नव्याने
तुझ्या सवे फुलणे
किती जीव घेणे...! 

 

अबोली गुलाबी
तुझे उखाणे
तुला उलगडणे
किती जीव घेणे...! 

 

जरी जीव घेणे
सारे बहाणे
तुझ्यावीण जीणे
किती जीव घेणे...!

 

 

                          "समिधा"

 

३ टिप्पण्या :

  1. अशा कविता लिहिताना मात्रांचा विचार फार गांभीर्याने करायला हवा समिधाजी. एखादी मात्र कमी जास्त असेल तर चालू शकते. पण आपल्या कवितेत अनेक दिन पोलीतील मात्रांमध्ये तीन ते पाच मात्रांचा फरक आहे. त्यामुळे कवितेतली प्रासादिकता हरवते.

    उत्तर द्याहटवा