मंगळवार, २१ जून, २०१६

वटपौर्णिमा .... !!

 

मी शोधेन म्हणते तुलाच
सातजन्मांतरीच्या फे-यात
फेर नसावेत फक्त बंधनाचे
असावेत ते एखाद्या जन्मी
फक्त श्वास आदी अंताच्या पल्याड!!

 
मी मागते तुला पुन्हा पुन्हा
न उलगडलेला तू
आणि ......
न सापडलेली मी..
एकाच जन्मात...!!
तु भेटशील एखाद्या जन्मात
फक्त माझा , सखा होऊन
विमुक्त , शरिरापल्याड....!!!

                      


                               " समिधा "



३ टिप्पण्या :

  1. विषय चांगला आहे वृत्ता चा अभ्यास हवा

    उत्तर द्याहटवा
  2. काहीतरी चुकल्यासारख वाटतंय.

    उत्तर द्याहटवा
  3. मला वाटते तो न सापडलेला तुमच्या कवितात विरह देऊन गेलेला तो तुम्ही ह्या कवितेत परत परत मागत आहात जो तुम्हाला उलगडलेला नाही एकाच जन्मात... मला संदर्भ लागला थोडासा..


    फक्त श्वास आदी अंताच्या पल्याड!! .... ह्याचा अर्थ कळाला नाही..

    उत्तर द्याहटवा