मंगळवार, १० जानेवारी, २०१७

हया अंतरीच्या गाठी.......



Image may contain: 1 person



कधी येशील सख्या
जड पापण्या झाल्या
झाड मिटून गेले
सावल्याही विरल्या ...!

 

गंधाळली रात दारी
नक्षत्रांची तोरणे ल्याली
तुझी एक झलक पहाण्या
सवे चांदण्याही जागल्या ...!

 

चंद्र तेवतोय मंद
धीर उचंबळे श्वासात
अंतरीची नजर
तुझ्या वाटेत पसरल्या ..!

 

सरू नकोस सख्या
मला दिलेली वचने
प्राण प्रतिक्षा फुंकून
त्यांसी ह्रदयी स्थापिल्या ...!

 

किती सरली युगे
जन्म घेऊ किती सख्या
एका जन्माची नाही आस
हया अंतरीच्या गाठी
जन्मजन्मांतरी बांधल्या ...!!!

 

 

                                             ©"समिधा"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा