भंगल्या सुखांची मी घडी केली
अनं आयुष्याच्या उशाशी ठेवत गेली !
दु:खांना दुखावले मी कधीच नाही
दु:खातही हसण्याची करामत केली !
कितीदा बजावले मी मनाला तरी
पुन्हा पुन्हा इच्छांची तोरणे बांधली !
माझ्याच वळचणीला मी अनोळखी
गर्दी कुणा दुस-यांचीच दारात पाहिली !
मुक्त व्हावे त्याच्यातुनी मी खुपदा ठरवते
फक्त त्याची सय येता पुन्हा जाते बांधली !
@ समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा