माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५
बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५
काही तुला सांगावे .... !
काही तुला सांगावे .... !
काही तुझे ऐकावे …!
पुरे झाले एकमेकां पहाणे
मौनात गेले कितीक दिसराती
शब्दांचे झूले मनातच झूलती …!
कधीतरी स्फुरावे अंतरंगी स्वरांना
तुझ्या माझ्यातले मौनातले गाणे ....!
असा सडा शब्दांचा पडावा
मोहरून जावीत झाडफुलपाने
अनं …तशातच माझे लाजुन हसणे …!!!
" समिधा "
गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५
सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५
प्राजक्ताचे सडे......!
वाट पहाणे ....
कधी, केव्हा पडतील अंगणी
प्राजक्ताचे सडे......!
तू मनातच बरसत रहा
मी झेलीत राहीन तुझे अविरत …
आठवणींचे सडे .....!
" समिधा "
सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५
काश मला तू .....!!

काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला अडवतांना रडला नसतास …!
सहज तुला विसरले असते कदाचित !
घाव घालून भरलेल्या जखमांना पुन्हा
नुसते पाहिले तरी आठवतात वेदना …
पण तुझे तसे नव्हते ....!!
वेदनांचाच तू नेमका धरून हात
आयुष्यात केला होतास शिरकाव …
वेदनांचा फायदा तुलाच नेमका
कसा उमगला …?
काश मला तो उमगला असता ....!
तर -
तुझे आयुष्यात येणे रोखले असते कदाचीत …!
माझ्या वेदनांना तटबंदीत कोंडले असते
मग सहनुभूतींना धुमारे फुटलेच नसते …
काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला अडवतांना रडला नसतास …!
तुला विसरायला झगडले नसते , पण
आठवतांना तू आता कवितेतून येतोस …
आणि मग कविता होउनच सोबत राहतोस …
काश कवितांना श्वासात भिनवले नसते … !
काश मला तू जातांना भेटला नसतास
काश मला अडवतांना रडला नसतास …!
" समिधा "
बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५
निःशब्द शब्द होते …!!
हातात हात घालून चालतांना
वाटलेच नाही
सुटतील कधी !
एक एक स्वप्न जोडतांना
वाटलेच नाही
तुटतील कधी !
फार लांबवर
चाललोच नाही
स्वप्न घेऊन उराशी
असे कसे हरलो आपण
नियतीशी लढलोच नाही !
हात होते सुटलेले
स्वप्न होते तुटलेले
डोळा तुझ्या होते पाणी
मी मात्र स्तब्ध होते
तुझ्या माझ्यात फक्त
आता निःशब्द शब्द होते
निःशब्द शब्द होते …!!
" समिधा "
सोमवार, १० ऑगस्ट, २०१५
काय फरक पडतो ....!
काय फरक पडतो ...
तू तिथे ....
अनं मी इथे …
तुझ्या वेदनेचा भास,
मला इथे होतो
अनं -
माझ्या आठवांचा
स्पर्श तुला तिथे होतो …!
काय फरक पडतो ....
तू तिथे …
अनं मी इथे …
तुझ्या श्वासांची ऊब
मला इथे जगवते
अनं -
माझ्या आसवांची
गाज़ तुला तिथे कळते …!!
काय फरक पडतो ....
तू तिथे …
अनं मी इथे
तू अव्यक्तातही
खुप काही बोलतो
अनं -
माझ्या कवितांच्या
गाभ्यातून अविरत फुलतो …!!!
" समिधा "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
